कोसंबी गवळी जवळ वाघाचा हल्ला : एक महिला ठार : परिसरात एकूण चार वाघ असल्याची वनविभागाची माहिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोसंबी गवळी जवळ वाघाचा हल्ला : एक महिला ठार : परिसरात एकूण चार वाघ असल्याची वनविभागाची माहिती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -

तालुक्यातील कोसंबी गवळी जवळ वाघाचा हल्ला झाला असून त्यात एक महिला मृत्युमुखी पडली असून गावकर्यांनी रात्रभर शोधमोहीम राबविल्यानंतर सकाळी मृतदेह सापडला असून परिसरात वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय ठरत आहे.


काल दिनांक 14नोव्हेंबर सायंकाळी 7 च्या सुमारास सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या देवकन्या संपत चौधरी (वय -45)या घरी परतल्या नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध सुरु केली असता, त्याणींसोबत नेलेले सामान गावालगतीच्या शेतशिवारात अस्थाव्यस्त पडून सापडले.

ही माहिती जि.प.सदस्य संजय गजपुरे यांना कळताच, त्यांनी गावकर्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले असता, एकूण चिन्हांवरून वाघाचा सदर महिलेवर वाघाचा हमला झाला असावा अशी शंका असल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली. तर सद्यस्थिती परिसरात 4वाघ फिरत असल्याची माहिती वनविभागाने गावकर्यांना देत शोधमोहीम सुरु केली असता आज दिनांक 15नोव्हेंबर सकाळी 6:30 वाजता सदर महिलेचे शव काही अंतरावर सापडले आहे.


परिसरात दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून, वन्य प्राण्यांवर नजर ठेऊन योग्य सावधानी सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास वनविभागाची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांत रोष आहे.