स्वच्छतेचे वाजले तीन तेरा स्वच्छता करताना रस्त्याच्या कडेला ठेवतात कचऱ्याचे ढीग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्वच्छतेचे वाजले तीन तेरा स्वच्छता करताना रस्त्याच्या कडेला ठेवतात कचऱ्याचे ढीग

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर नगर परिषद अंतर्गत कंत्राटदार मार्फत स्वछता करण्यात येत असले तरी त्या कडे दुर्लक्ष होत असून कचरा व घाण वास मुळे जनता त्रस्त होत असल्याचा आरोप नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी केला आहे.
      
चिमूर नगर परिषद अंतर्गत कंत्राटदार मार्फत स्वच्छता अभियान राबविले जात असताना  मुख्य मार्गावरील स्वच्छता करीत असताना कचरा ,माती नालीजवळच ठेवत असतात त्यामुळे अजूनही साफसफाई होत नाही तसेच स्टेडियम  कृषी उत्पन्न बाजार समिती व  न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बाभूळी चे झाडे वाढले असून त्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीे. 

तसेच कचरा टाकले जात असून शितारा अन्न टाकत असल्याने दुर्गंधी  वास येत असल्यामुळे आरोग्यासाठी घातक आहे मच्छरांचा हैदोष वाढलेला आहे .पहाटेला सुदृढ  आरोग्यासाठी नागरिक फिरायला जातात परंतु जात असतानाच दुर्गंधी वासेचा सामना करावा लागत आहे. 


   
नालीवर अतिक्रमण वाढले असल्याने दुकाने लावली असल्याने नाली उपसा होत नाही नालीत गाळ साचला असल्याने पाणी पास होत नाही त्यामुळे सुद्धा वास येत असून मच्छर वाढले आहे तसेच डुकराचा हैदोष वाढलेली आहे त्याचा पण बंदोबस्त करावा.


   
चिमुरात डेंग्यू चे रुग्ण आढळत असताना नप चे दुर्लक्षच आहे अस्वछे कडे नप शासन प्रशासन चे वेळ काढू धोरण असून संबंधित कर्मचारी यांचे सुद्धा लक्ष नाही  नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दखल घेऊन स्वच्छता अभियानात लक्ष घालून स्वच्छता करण्याची मागणी नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे.