अखेर उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे कंत्राट रद्द - चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार काय प्रश्न कायम ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर उज्ज्वल कन्स्ट्रक्शनचे कंत्राट रद्द - चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार काय प्रश्न कायम !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील नागरिकांना इरई नदीत मुबलक साठा असून सुद्धा पाण्यासाठी भटकविणाऱ्या उज्वल कन्स्ट्रक्शनचे कंत्राट अखेर रद्द करण्याचा  महानगर पालिकेच्या विशेष सभेत ठराव मंजूर करण्यात आला असून ,  अमृत पाणी पुरवठा योजना सुरू होत पर्यंत पाणी पुरवठयाचं काम महानगरपालिका सांभाळणार आहे.


मागील काही वर्षांपासून शहरात अनियमित व गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू होता, या विरोधात पालिकेतील काही नगरसेवकांनी पाण्याचा मुद्दा सभागृहात मांडला,शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या इरई नदीत मुबलक पाणी  साठा असल्यावरही ठिकठिकाणी पाईप लाईन फुटून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत होती.  पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.  

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे जेव्हा या समस्येचं निवेदन अनेकांनी दिले  त्यावेळी कंत्राट रद्द करण्याचे पालिका पदाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले परंतु पालकमंत्र्यांचे निर्देश पदाधिकारी यांनी धुडकावून लावले होते हे ही विषेश.मात्र आता निवडणूक पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये म्हणून पालकमंत्र्यांच्यानिर्देशांची आठवण अचानक सर्व नेगरसेवकांना झाली.

मात्र आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरातून दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडले असून या पाण्याची समस्या सुद्धा आता त्यांना कानाने स्पष्ट ऐकायला जाऊ लागली असून, पराभवाचे  चिंतन करते वेळी  प्रमुख कारण शहरातील कंत्राटदार निर्मित कृत्रिम पाणी टंचाई व त्या कंत्राटदारावर पालिकेतील प्रमुखांची पाठराखण असल्याचे चर्चिले जात होते.


आज पालिकेच्या विशेष सभेत पाण्याच कंत्राट रद्द करण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी पुढाकार घेत उज्वल कन्स्ट्रक्शनचे कंत्राट रद्द करण्यात आले.

उज्वल कन्स्ट्रक्शनचे संचालक योगेश समरीत व त्यांच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत होती, नागरिकांनी पाणी पुरवठ्याबद्दल विचारणा केली तर ते समाधानकारक उत्तर देत नव्हते, समरीत यांनी महावितरणचे दीड कोटी थकविल्याने 2 दिवस शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता व जेष्ठ नेत्यांच्या वजनाने हा विषय सोडविण्यात आला होता.