चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा येणार महिला राज : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा येणार महिला राज : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :-
राज्यातील 24जिल्हापरीषदांच्या उर्वरीत जिल्हाध्यक्ष कार्यकाळाकरिता आज आरक्षण जाहीर झाले असून चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी खुला प्रवर्ग महिला अशी सोडत निघाली आहे. 

राज्यातील संपूर्ण आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर.