पुन्हा महिलाच महापौर ! : आज झालेल्या आरक्षण सोडतीत चंद्रपूर महानगरपालिकेकरिता असे निघाले आरक्षण. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुन्हा महिलाच महापौर ! : आज झालेल्या आरक्षण सोडतीत चंद्रपूर महानगरपालिकेकरिता असे निघाले आरक्षण.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राज्यातील 27 महापालिकांतील महापौर पदाचे आरक्षण आज दिनांक 13 नोव्हेंबर बुधवारी काढण्यात आले  नगर विकास  विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी साडे तीन वाजता सोडत काढण्यात आली.

सोडतीवेळी महापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र नगर विकास विभागाचे अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काल दिनांक 11 नोव्हेंबर सोमवारी पाठविले होते.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या पुढच्या अडीच वर्षाच्या टर्म करिता महापौर आरक्षण सर्वसाधारण महिला असे निघाले आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या 2017 निवडणुकीनंतर पहिल्या महापौर  अडीच वर्षाच्या कार्यकाळाकरिता इतर मागास वर्गीय महिला हे आरक्षण आल्याने निवडणुकीत बहुमत प्राप्त भाजपच्या सौ.अंजली घोटेकर यांची महापौर पदी वर्णी लागली आता सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुक पुरुष नगरसेवकांचा हिरमोड झाल्याची चर्चा शहरात आहे.

राज्यातील 27 महानगर पालिकांची  महापौर सोडत पुढीलप्रमाणे : 
 • मुंबई- ओपन
 • पुणे - ओपन
 • नागपूर - ओपन
 • ठाणे- ओपन
 • नाशिक - ओपन
 • नवी मुंबई - ओपन महिला
 • पिंपरी चिंचवड - ओपन महिला
 • औरंगाबाद- ओपन महिला
 • कल्याण डोंबिवली - ओपन
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - ओपन महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- ओपन महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला - ओपन महिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर - बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे - बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला