गोंडवाना विद्यापीठातील शेतकऱयांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ - अभाविप च्या पाठपुऱ्यावाला मोठे यश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडवाना विद्यापीठातील शेतकऱयांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ - अभाविप च्या पाठपुऱ्यावाला मोठे यश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


राज्यात मोठ्या प्रमाणात सर्वदूर पाऊस पडला त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण शेती पाण्यात बुडून गेली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. गोंडवाना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मूल शिक्षण घेतात.परीक्षा शुल्क भरणे शक्य होत नाही आहे.त्यामुळे त्यांची परीक्षा शुल्क माफ करावे. मोफत बस पासेस उपलब्ध करून द्यावे.व इतर कोणतेही महाविद्यालयीन आणि शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मा. कुलगुरू, जिल्हाधिकारी, सिनेट सदस्य याना निवेदने व योग्यरीत्या पाठपुरावा केला होता. त्याला 15 नोव्हेम्बर ला झालेल्या सिनेट अधिसभेत हा प्रस्तव सिनेट सदस्य मा.श्री.संजय जी रामगिरीवर यांनी अधिसभेत मांडल्यावर प्रस्ताव पारित करण्यात आला. 
     
शैक्षणिक सत्र 2019-20 चे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले.यामुळे विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे,मागणीचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कौतुक  होत आहे.