महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत धानोली येथे पार पडली पेसा कायदा कार्यशाळा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत धानोली येथे पार पडली पेसा कायदा कार्यशाळा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना :


महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत येत असलेल्या  ग्रामपंचायत धानोली येथे पेसा कायदा कार्यशाळा व बालकांचे हक्क या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री पाचपाटील साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना कार्यक्रमाचे आध्यक्ष विजय ग.रणदीवे सरपंच तर प्रमुख मार्गदर्शक भोयर व धारने प्रमुखपाहुने  बाळुजी कोवे उपसरपंच, किसनजी चाहकाटे,  संपतजी मडावी पेसा अध्यक्ष, शूषमाताई किन्नाके पो .पाटील नंदाताई मडावी, प्राचीताई आडे, मारोनीबाई राठोड, सदस्य सुरेशजी किन्नाके पोष्ट मास्तर हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मा.गटविकास अधिकारी यांच्ये ग्रा.प च्या वतीने शाल,श्रीफळ व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी मा.गटविकास अधिकारी पाचपाटील सर यांनी गाव विकासामध्ये गावकऱ्यांन ची भूमिका व पेसा निधी 15 वित्त आयोग व शासकीय योजना यांचा कृतीसगम तयार करून आपल्या गावाच्या समस्या चे प्राधान्य क्रमाने सोडवणूक करण्या बाबद मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय रणदिवे यांनी गावातील झालेल्या विकास कामाची माहिती दिली. व प्रलंबित कामे सरांना सांगून ते तात्काळ पूर्ण करायची विनवणी केली.त्या नंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यस्तरीय जिल्हा प्रशिक्षक प्रवीण भोयर व धारणे  यांनी पेसा कायदा व कायद्यातील बारकावे समजून सांगितले.पेसा कायद्या विषयी आमच्या गावात आम्हीच सरकार हा लघु चित्रपट देखील दाखविण्यात आला.कार्यशाळा संपल्यावर विविध चित्रफिती च्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्यात आली.


या कार्यक्रमाकरीता गावातील शाळेतील मुख्याध्यापक, शीक्षक अंगनवाळी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,आशा   र्वरकर ,सुपर वायझर, सर्व समीतीचे सदस्य, बचत गटाच्या महीला उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.वानखेडे साहेब ग्राम प्रर्वतक यांनी केले सदरील कार्यक्रमात विविध छत्रफीत दाखवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली तर प्रस्ताविक भोयर सर  आभार प्रदर्शन घूगे साहेब सचिव यांनी केले या कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सुनिता किन्नाके ,संतोष आत्राम यांनी पार पाडले.