भद्रावती शहरातील एसबीआय बैंक एटीएम फोडून रोकड चोरी ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भद्रावती शहरातील एसबीआय बैंक एटीएम फोडून रोकड चोरी !

Share This
नगरपरिषद तर्फे सीसीटीवी चौकाचौकात लावण्यात यावे, जनतेतून मागणी ! खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती -

भद्रावती शहरात काल रात्रीतून एसबीआय बैंकेचे एटीएम गॅस कटर ने कापून लाखो रुपये ची रक्कम चोरटयांनी  लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शहरातील मेन रोड ला लागुन विजय मत्ते यांच्या दुकानाजवळ वडा पाव व आइस क्रीम चे दुकान आहे. त्या इमारती मध्ये एस .बी .आई बँकेचे एटीएम अज्ञात चोरांनी मध्यरात्रौ गॅस कटर च्या  सहाय्याने फोडून लाखों रुपये ची रक्कम चोरून नेल्याची घटना आज दिनांक 26नोव्हेंबर ला पहाटे उजेडात आली. 


भद्रावती शहराच्या आजूबाजूला असलेले कोळसा उद्योग  आणि आयुध निर्माण कारखाना वसाहत यामुळे हे शहर हे मोठी बाजारपेठ आहे.अर्थात इथे बैंकिंग व्यवस्था चांगल्या दर्जाची असणे अपेक्षित आहे. मात्र तशा प्रकारची व्यवस्था इथे नाही.विविध बँकेचे एटीएम आहे पण तिथे एकतर रोकड राहत नाही अथवा राहिली तर तिथे सुरक्षा नाही. शहरात सुरक्षेच्या द्रुष्टीने चौकाचौकात सीसीटीवी कैमेरे लावण्यात आले नाही आणि एटीएम परिसरात सुद्धा लावण्यात आले नसल्याने त्याचा फायदा चोर घेत असल्यानेच इथे चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. भद्रावती शहरात अनेक एटीएम मशीन मध्ये सुरक्षा गार्ड व सीसीटीवी नसल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.या घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सिंघ पवार करीत आहेत.अशा चोऱ्यांवर आळा बसावा या करिता नगरपरिषद तर्फे चौकाचौकात सीसीटीवी कैमेरे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होतं आहे.