बळवंत गौरकर यांचा निर्घृणपणे खून : न्यायप्रविष्ट जमिनीचे वादातून -आठ संशयित इसम पोलिसांच्या ताब्यात, शंकाकुशंकाना पेव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बळवंत गौरकर यांचा निर्घृणपणे खून : न्यायप्रविष्ट जमिनीचे वादातून -आठ संशयित इसम पोलिसांच्या ताब्यात, शंकाकुशंकाना पेव

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :आष्टी -

आष्टी येतील शिवाजी चौकापासून अवघ्या  ६०० मि. अंतरावरील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर काल दि.०५/११/०१९ ला रात्री अंदाजे १०.०० ते १०.३० चे सुमारास बळवंत चंद्रशेखर गौरकार वय ५० रा.जैरमापुर हल्ली मुक्काम आनंदनगर चंद्रपूर यांचा धारदार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला.

घटनास्थळावरून मृतकाचे दूरध्वनी संच , दुप्पट्टा, सतुर हस्तगत केले. सविस्तर असे की मृतक व त्यांचे सहकारी सुरेश कुत्तरमारे एका दुचाकीने सदर रस्त्याने जात असताना ,त्यांना रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने व लाठीने त्याच्या डोक्यावर वार करून शरीरावर बऱ्याच ठिकाणी वार करून जिवानिशी ठार केले.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी आपल्या वाहनावर बळवंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

फिर्यादी मृतकाचे भाऊ शालिक चंद्रशेखर गौराकर वय ४६ यांचे तोंडी तक्रारीवरून आष्टी पोलिसांना संशयित इसमना ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये १) प्रमोद लखमापूरे २) प्रदीप लखमापूरे ३) कपिल रामचंद्र पाल ४) संजय पोटवार५) विनायक पाल ६) राकेश बेलसरे ७)सुधीर पाल ८)मोरेश्वर पाल हे सर्व राहणार आष्टी यांचे विरूद्ध १५४/२०१९ अन्वये कलम ३०२,३४१/१२० ब, १४७,१४८,१४९ भांदवी सह कलम १३५ मुपोका नुसार गुन्हा दाखल केले आहे.अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी बजरंग देसाई अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल पुढील तपास करीत आहेत.