रीया मडावीचा मृत्यू प्रकरणी नवनिर्वाचीत आ. सुभाष धोटेंनी ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा आढावा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रीया मडावीचा मृत्यू प्रकरणी नवनिर्वाचीत आ. सुभाष धोटेंनी ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा आढावा

Share This
-मृतक मुलीच्या पालकांना केली आर्थिक मदत व  महिन्याभरात अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा  :- 

काल दिनांक ६ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे जिवती तालुक्यातील टिटवी गावातील रिया मोतीराम मडावी २ वर्ष ६ महिने हीचा मृत्यू झाल्याचे नवनिर्वाचीत आमदार सुभाष धोटे यांना समजताच आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी ग्रामीण रुग्णालय, राजुरा येथे भेट देऊन मृतक रिया च्या पालकांची विचारपूस केली, त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ताबोडतोब त्यांना आर्थिक मदत केली, त्यांना टिटवी, जीवती येथे जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.

              
अडीच वर्षीय रिया मडावी ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी भरती करून तीच्यावर उपचार  करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तीला गडचांदूर येथे रेफर करण्यात आले होते. पालकांनी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रूग्णलय चंद्रपूर येथे डॉक्टरांनी रेफर केले. मात्र रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध न झाल्यामुळे व प्रकृती अधिकच खालावल्याने चिमुकली रिया चा मृत्यू झाला होता.
        
आमदार सुभाष धोटे यांनी या पार्श्वभूमीवर आज ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. कुडमेथे यांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना केल्या आणि मा. उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर व जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर यांच्याशी संपर्क करून सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून राजुरा येथे एका महिन्याच्या आत अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे, त्यासाठी आवश्यक असणारा अधिकारी वर्ग व अन्य स्टाफ देण्यात यावा, रुग्णवाहिका सेवा अद्ययावत करण्यात यावी, येथे असलेल्या साधन सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करून परिसरातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात यावे अशा सुचना केल्या.

      
या प्रसंगी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, साईनाथ बतकमवार, पाटण येथील वाघू उईके यासह अनेकांची उपस्थिती होती.