अज्ञात जड वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटकाचे खांब कोसळले : सुदैवाने जीवित हानी टळली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अज्ञात जड वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटकाचे खांब कोसळले : सुदैवाने जीवित हानी टळली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने  राजुरा-गोवारी मार्गावरील वेकोलिकडे जाणाऱ्या मालवाहक रेल्वे गाडीचे गेट तुटून पडले.अनेक वर्षांपासून वेकोलिच्या सास्ती कोळसा खाणीतून इतर ठिकाणी कोळसा वाहतूक करण्याकरिता राजुरा-गोवारी रेल्वे रूळ टाकलेले असून अपघाताचा धोका टाळण्याकरिता व क्षमतेपेक्षा अधिक वजनाची जड वाहतूक रोखण्याकरिता या रेल्वे रुळाच्या काही मीटर आधी हे सुरक्षा गेट बसविण्यात आले आहे.काल दिनांक 5नोव्हेंबर ला दुपारी 4 च्या आसपास एका अज्ञात जड वाहनाने धडक देत या गेट चे खांब 150मीटर दूर फरफटत नेले व धूम ठोकली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही या परिसरातून जड वाहतुकीचा मार्ग नसून आवश्यकता ही नाही तरीही नेहमीच अवैध वाहतूक होते या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.