खाणीतला बाप! : युवा कवी आदित्य आवारी यांची मनघेवडी कविता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खाणीतला बाप! : युवा कवी आदित्य आवारी यांची मनघेवडी कविता

Share This
खाणीतला बाप!

डोईवर टोपी घालून,बत्तीच्या प्रकाशानं
काळ्या गच्च अंधारात पायवाट शोधतो तो!
पायात गमबूट घालून चिखल तुडवत
थंड,काळ्याशार पाण्यात राबतो तो! 

आपला कुहाड कधिच बोलका न करता,
वेदनेच्या वस्तीत वास्तव करतो तो! 
देखणा दिसायचा खाणीत जायच्या आधी
आता काळा कूटं माझ्या नजरेस भासतो तो! 

आधी हिरव्यारम्य निसर्गाच्या सानिध्यात असायचा
आता कोळश्याचा धूळ खात असतो तो!
चालतांना त्याच्या पायात होतो वेदनेचा कहर
अन् मग तो त्या वेदनेशी झगडत बसतो! 

खाणीत दगान होते वेळी हळहळतो त्याचा देह
घरी परतल्यावर बिछान्यात गाढं निजतो तो! 
घरच्यांच्या उदरनिर्वाहासाठी रोज कष्टाचा डोंगर
उरावर घेत,मृत्यूशी झुंज देत असतो तो! 

-आदित्य दिनकर आवारी 
  ९६०४०००९७६
(ही कविता ऐकण्यासाठी https://youtu.be/RWoeW7MTg38 या लिंकला भेट द्या)