संविधान दिनानिमित्त मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे या विषयावर व्याख्यान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संविधान दिनानिमित्त मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे या विषयावर व्याख्यान

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक, इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सुरवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले त्यांनतर भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, संविधान सर्व भारतीयांना कळावे व संविधानाचा अभ्यास सर्व भारतीयांनी करून संविधानाचे पालन करावे हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरेश कोरे कै. बी.बी. काळे वैद्यकीय महाविद्यालय लातूर, प्रा. डॉ. राजेंद्र मुद्दमवार राज्यशास्त्र विभागप्रमुख, डॉ. विश्वास शंभरकर रसायनशास्त्र विभागप्रमुख लाभले होते, वक्त्यांनी संविधानाच्या विविध भागावर सर्वांगाने चर्चा केली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड  उपस्थित होते.


यावेळी महाविद्यालयातील रासेयो पथकाचे स्वयंसेवक, अन्य विद्यार्थी व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुदास बालकी तर संतोष निरांजने यांनी आभार मानले.