जयवंत वानखडे,यांच्या "हळव्या मनाचे गुंजन" काव्य संग्रहालास्व.सुरेश भट स्मृती जीवन गौरव पुरस्कार जाहीर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जयवंत वानखडे,यांच्या "हळव्या मनाचे गुंजन" काव्य संग्रहालास्व.सुरेश भट स्मृती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


अखिल वैदर्भीय वऱ्हाडी साहित्य मंच अमरावती व्दारे उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून कोरपना येथील रहिवासी माजी प्राचार्य श्री.जयवंत वानखडे, यांच्या "हळव्या मनाचे गुंजन "  ह्या काव्यसंग्रहास मानाचा स्व.सुरेश भट स्मृती जीवन गौरव पुरस्कार जाहीर  करण्यात आला आहे.


सदर पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक  अध्यक्ष श्री. का. रा. चव्हाण यांनी केली असून दिनांक ९ व १० नोव्हेंबर २०१९ रोजी श्रीमती विमलाबाई देशमुख महाविद्यालय,अमरावती येथे होणाऱ्या प्रतिष्ठानच्या साहित्य सम्मेलनातच सम्मेलनाध्यक्ष डॉ सतीश तराळ, हास्यसम्राट मिर्झा रफी अहमद बेग ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ढाले


पाटील, सुप्रसिद्ध कथाकार बाबाराव मुसळे ,स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कवी जयवंत वानखडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असून सदर संग्रहास त्यांच्या साहित्यिक गुरू सुप्रसिद्ध गझलकारा ऊर्मिलाजी बांदिवडेकर ,मुंबई यांची प्रस्तावना लाभली आहे.
सदर पुरस्कार जाहीर केल्याबद्दल श्री जयवंत वानखडे यांनी अखिल वैदर्भीय वऱ्हाडी साहित्य मंच,अमरावती यांचे आभार मानले आहे.टीम खबरकट्टा तर्फे श्री जयवंत वानखेडे यांचे भरीव अभिनंदन 💐💐