जिवती नगर पंचायतीचा बेकायदेशीर कचरा डेपो ठरतोय नागरिकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती नगर पंचायतीचा बेकायदेशीर कचरा डेपो ठरतोय नागरिकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर: जिवती -संतोष इंद्राळे  


जिवती नगर पंचायतीच्या बेकायदा कचरा डेपो मुळे पर्यावरणाचे व नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होताना दिसत आहे, तो कचरा डेपो हटविण्याबाबत काही नागरिकांनी एकत्र येत सौ.पुष्पाताई नैताम,नगराध्यक्ष  न.प.जिवती यांना  अनेकदा निवेदने दिली मात्र प्रशासन झोपल्याचे सोंग घेतल्याचे  दिसत आहे.


याच डेपो मुळे नागरिकांना,विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे,तिथेच जिवती ला पाणीपुरवठा करणारी विहीर,तलाव आहे ते पण पाणी दूषित होत आहे.कचऱ्यातील टाकाऊ खाद्य पदार्थ खाऊन अनेक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे,कचऱ्यावर अनेक भटक्या कुत्र्यांचे विद्रुपीकरण वाढले आहे,त्यामुळे नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.म्हणून नगर पंचायतिने बेकायदा असलेला कचरा डेपो कुठेतरी दूर लवकर  स्थलांतरित करावा,नाहीतर जीवतीवाशीया कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे म्हटले जात आहे.