आज अंबुजा सिमेंट फाउंडेशन अंतर्गत उत्तम कापूस उपक्रमांतर्गत जीवती तालुक्यात 2017 पासून राबविण्यात येत आहे,व उत्तम कापूस उपक्रम कार्यक्रमाअंतर्गत जिवती तालुक्यात 8712 शेतकरी कुटुंबासोबत काम करीत असताना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतरपीक चवळी,वाल, मूग,उडीद,मक्का हे पीक कापसात आंतरपीक म्हणून घेत शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात भर टाकली आहे.
उत्तम कापूस उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक काळजीपासून ते जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे,त्याच अनुषंगाने महिला शेतकाऱ्यासोबत कामकरित असताना बचतगटाना एकत्र करून शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून कापूस खरेदी व विक्री करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे त्यांना थेट जिनिग मालकसोबत सवांद साधून देने त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी प्रकल्प प्रयत्नशील आहेत,त्याच माध्यमातून प्रकल्पासोबत इंदिरा एक्झिम सोनूर्ली,वैभव व्हाईट गोल्ड पांढरपौनी, गणेश कोटेक्स खामोना,श्रीगुरुदेव धोपटला,साईजिनिंग वेंढली,पारस ऍग्रो वरोरा,प्रकाश व्हाईट गोल्ड समुद्रपूर या जिनिंग सोबत प्रकल्पाचा करार करून देऊन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची दलाली,हमाली,काटा,व इतर भाडे घेतले जाणार नाही.
त्याचाच एक भाग म्हणून जिवती येथील महिला शेतकरी यांना इंदिरा एक्झीम सोनूर्ली येथे जिनिंग भेट घेऊन त्यांना जिनिंग मालकासोबत सवांद साधून देत जिनिंगमध्ये कापसाच्या गाठी कश्या प्रकारे तयार होतात,गठान कशी बनवतात तेल,ढेप,याविषयी प्रक्रिया दाखविण्यात आली.
अंबुजा सिमेंट फाउंडेशन जिवती मधील पी.यु.मॅनेजर श्री.दिपक साळवे,सुभाष बोबडे यांनी शेतकऱ्यांना आपला कापूस कोठेही न विकता थेट जिनिंग मध्ये विक्री करावा असे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.