बळीराजा विचारपीठावर शेतकरी हक्क परीषदेची चंद्रपुर शहरात जय्यत तयारी सुरु : विदर्भातील दुसरी भव्य परिषद 26 नोव्हेंबर ला आयोजीत : गावागावात प्रचार व प्रसार -विदर्भातून दहा हजार शेतकरी येणार - शेतक-यां संबंधित विविध विषयांवर चर्चा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बळीराजा विचारपीठावर शेतकरी हक्क परीषदेची चंद्रपुर शहरात जय्यत तयारी सुरु : विदर्भातील दुसरी भव्य परिषद 26 नोव्हेंबर ला आयोजीत : गावागावात प्रचार व प्रसार -विदर्भातून दहा हजार शेतकरी येणार - शेतक-यां संबंधित विविध विषयांवर चर्चा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

स्थानिक चांदा क्लब ग्राउंड समोरील न्यग्लीश क्रिडांगणाच्या पटांगणावर विदर्भातील एकदिवसीय दुसरा भव्य शेतकरी हक्क परीषद भरविली जाणार आहे.

उद्या मंगळवार (दि.26) ला आयोजित केलेली आहे सकाळी 8.00 वा. पासन या परीषदेला सरुवात हात असून दिवसभर विविध सत्र राबविल्या जाणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आली आहे. महाराष्ट्रात लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहे. वन्यप्राणी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान करीत आहे. आता आम्ही कीती दिवस रडत बसणार आहोत, आता आम्ही रडणार नाही तर लढणार आहोत, या विचारांना घेवुन ही भव्य शेतकरी हक्क परीषद आहे.

या परीषदेचे उदघाटन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी करणार असून अध्यक्षस्थानी शेतक-यांचे कैवारी आमदार बच्चू राहणार आहेत. सोबतच शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील, रेगारी राचूरे, अमर हबीब, प्रकाश पोहरे, राजकुमार पटले, अजित नवले, चंद्रकांत वानखेडे, विजय जावंधिया, वामनराव चटप आदी शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी हक्क परीषदेकरीता न्यू इंग्लिश क्रीडांगणाचे पटांगणावर भव्य शामीयाना उभारला असून सभास्थळाला बळीराजा विचारपीठ असे नाव देण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील -

🔴सकाळी 11 वा. उदघाटन सत्र पार पडणार आहे. दुपारी 12 वा. प्रथम सत्र सुरु होईल. प्रथम सत्रामधे 'वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान व शासनाने करावयाचे नियोजण' या विषयावर चर्चा होणार आहे. 

🔴दुसरे सत्र 1 वा. सुरु होईल, यात 'पिकविमा योजना व शासकीय कायदे तथा शेतक-यांच्या मुलांना नौकरी व रोजगार' या विषयावार चर्चा होणार आहे. 

🔴दुपारी 2 ते 2:30 पर्यंत भोजण अवकाश राहील.

🔴तीसरे सत्र दुपारी 2:30 वा. सुरु होईल, यात शेतक-यांच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग : स्वामीनाथन आयोग' या विषयावर चर्चा होणार आहे. शेवटी 3:30 वा. समारोपीय सत्र असेल यात योध्दा शेतकरी' या विषयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर खुले सत्र होईल, त्यात शेतक-यांच्या प्रश्नांचे निरसण केल्या जाईल.


मागील एक महिण्यापासुन विदर्भातील गावोगावी जावून शेतक-यांमधे या हक्क परीषदेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विदर्भातून जवळपास दहा हजार शेतकरी परीषदेला उपस्थित राहतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे.

" यासाठी नियोजणाची जय्यत तयारी सुरु असून शेतक-यांनी या परीषदेत आवर्जून उपस्थीत राहण्याचे आवाहण विठ्ठलराव बदखल,बळीराज धोटे, प्रा. विजय बदखल, रुद्रा कुचणकर, ईजि. दिलीप झाडे, सुनील मुसळे, प्रदिप बोबडे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, मुकेश वरारकर, अॅड. डॉ. अंजली साळवे, अरविंद वांढरे, गणेश झाडे, सुनील भोयर, प्रा. जयवंत काकडे आदींनी केले आहे.