तरुण वनरक्षकाची आत्महत्या : निलंबन रद्द करण्याकरिता आर्थिक मागणीतून मानसिक त्रास देत असल्याचा वरिष्ठाच्या नावासासहित सुसाईड नोट मधे उल्लेख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तरुण वनरक्षकाची आत्महत्या : निलंबन रद्द करण्याकरिता आर्थिक मागणीतून मानसिक त्रास देत असल्याचा वरिष्ठाच्या नावासासहित सुसाईड नोट मधे उल्लेख

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
जुनोना येथे वनविकास महामंडळ पश्चिम येथे वनरक्षक गणेश झोंबाडे या वनरक्षकाने आपल्या क्वार्टर मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

16 महिन्यापासून गणेश झोम्बाडे हा वनरक्षक निलंबित होता, कारण वनविभागाचे काही पैसे बँकेत भरणा करण्यास 1 महिना उशीर झाल्याने अधिकाऱ्यांनी गणेशला निलंबित केले होते.

निलंबित झाल्यावर अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे महिन्यात गणेशाच्या प्रकरणाची चौकशी करून त्याची बदली करणे अपेक्षित होते , परंतु वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गणेशला तब्बल 16 महिने निलंबित राहावे लागले, त्याला नोकरीवर पुन्हा रुजू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेशला पैश्यासाठी त्रास द्यायला लागले.
मूळचा चिखलदरा येथीलरहिवासी असलेल्या गणेश ने "बाबा मला वरिष्ठ अधिकारी खूप मानसिक त्रास देत आहे, मला नोकरीवर पुन्हा रुजू करण्यासाठी वारंवार  पैश्याची मागणी करीत आहे, म्हणून मी आपली जीवनयात्रा संपवित आहो" - असे शेवटचे उदगार गणेश झोम्बाडे यांनी आपल्या वडिलांना फोन वर कळवून गळफास घेत आत्महत्या केली.
गणेशने गळफास घ्यायच्या आधी सुसाईड नोट मध्ये अधिकाऱ्यांचे नाव नमूद केलेले आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निलंबित करण्याची मागणी वनविकास कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.