शेतकरी संघटनेचे राजकारण फक्त सूडाच्या दिशेने चाललेय काय ? - नागरिकांचा सवाल (राजकीय पऱिद्वेषातून टीका करणाऱ्या सुरज अवताडे ची होणार सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी संघटनेचे राजकारण फक्त सूडाच्या दिशेने चाललेय काय ? - नागरिकांचा सवाल (राजकीय पऱिद्वेषातून टीका करणाऱ्या सुरज अवताडे ची होणार सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड )

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

सोशल मीडियावर शेतकरी संघटनेचे नेते सुरज अवताडेने टाकलेल्या एका राजकीय पोस्टने संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रात खळबळ माजली होती. काँग्रेसचे नेते विजय बावणे यांनी सदर पोस्ट ही आमदार सुभाष धोटे यांच्या प्रतिमेची बदनामी करणारी असल्याचा आरोप करीत सुरजविरोधात कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी सूरजविरोधात गुन्हा नोंदविला.

चंद्रपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सूरजचा जामीन मंजूर केला असून सूरज अवताडे यांची तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आली आहे.येत्या ८ तारखेला कोरपणा येथे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेने याकरिता बैठक सुद्धा आयोजित केली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी हा विषय मुद्दाम चिघळवला असून सत्तेचा धाक शेतकरी मुलांवर दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटना युवक आघाडीचे नेते देव पडोले व निलेश चिंचोलकर यांनी माध्यमांत व्यक्त केले आहे.तर वामनराव चटप यांचा पराभव जिव्हारी लागल्याने शेतकरी संघटनेचे युवक हे बेताल वक्तव्य सोशल मिडियावर करीत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

या डिजिटल क्रांतीच्या सुवर्णं काळात प्रेत्येक गोष्टीत डिजिटल माध्यमांचा वापर वाढला असून भारतीय राजकारणात सोशल मीडिया ला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.या माध्यमातून कोणतीही माहिती तात्काळ मतदार / नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या नादात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची अधिकांश जागा सोशल माध्यमांनी घेतली असून याच्या वापरासोबत, अनेक दुष्परिणाम सुद्धा समोर येत आहेत. 

सोशल मीडिया च्या याच प्रचार-प्रपोगंडा चमूंनी,  असेच प्रेत्येक पाक्षत जाळे वाढविले असताना या विधानसभा निवडणुकीत प्रथमच शेतकरी संघटना या माध्यमातूनही  वावरताना दिसली.

अ‍ॅड.वामनराव  चटप यांच्या डिजिटल प्रचाराची धुरा सांभाळताना या संघटना सोशल चमू ने अक्षरशः स्थानिक पातळीवर जोर-धमकीची कुरघोडी करत विधानसभेतील अनेक मुर्राब्बी- स्थानिक राजकारणी व्याकरिमत्वांना जीव्हारीस आणले त्यामुळेच अवघ्या 3400मतांनी शेतकरी संघटनेला पराभव स्वीकारावा लागला असे मत एका जाणत्या चटप समर्थकाने व्यक्त केले असून या सोशल मीडिया चमूने साहेबांची प्रतिमा घालवत फक्त सूडबुद्धी प्रसरविण्याचे काम केले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. संघटनेच्या सोशल माध्यम चमूविषयी नाकारत्मक चर्चा सुरु असतानाच सुरज अवताडे प्रकरण झाल्यावर अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासारख्या कायदे-विचारवंत नेत्याकडून कुणाचीही का नसे ना, कोणत्याही विषयात का नसे ना -वयक्तिक स्वार्थासाठी अतिउतावीळ टिटवी उडविणाऱ्या अवताडे सारख्यांना अध्यक्ष पदभार देऊन  शब्बासी देणे, सूडबुद्धीला प्रोत्साहन देणे असून शेतकरी संघटनेच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनाच मंजूर नसल्याचे दबल्या आवाजात बोलल्या जात आहे.