मुलगाच निघाला वडिलांचा मारेकरी : वाहतूक पोलीस सुखदेव सोनुने यांची डोक्यात रॉड घालून हत्या करणाऱ्या मुलास तपासाअंती अटक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुलगाच निघाला वडिलांचा मारेकरी : वाहतूक पोलीस सुखदेव सोनुने यांची डोक्यात रॉड घालून हत्या करणाऱ्या मुलास तपासाअंती अटक

Share This
खबरकट्टा : चंद्रपूर -शहर प्रतिनिधी 


दिनांक 23नोव्हेंबर वाहतूक पोलीस रोजी सुखदेव महादेव सोनुने वय 54 वर्ष रा.पोलीस वसाहत, तुकुम चंद्रपुर यांचे डोक्याला मागील बाजुस गंभीर दुखापत असलेल्या स्थितीत त्यांचे राहते घरामध्ये त्यांची पत्नी व मुलगा यांना दिसुन आल्याने मृतकची पत्नी यांनी दिलेल्या प्राथमिक तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाणे  येथे अकस्मात मृत्यू क्र. 119/2019 प्रमाणे दाखल करुन तात्काळ तपास सुरु करण्यात आला होता.


या संदर्भात ज्या स्थितीत म्रूतदेह पडून होता आणि म्रुतकाच्या शरीरावर जखमा होत्या त्यावरून हा घातपातच असा संशय निर्माण झाल्याने  “चंद्रपूर वाहतूक शाखेचे मौहरर सुखदेव सोनुने यांचा घातपात” या हेडलाईन ची बातमी सर्वशित झाली होती.
या संदर्भात पोलिस अकस्मात मृत्युचा तपास करीत असताना प्राप्त वैद्यकीय अहवाल व मृतकचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने वय 24 वर्ष, यास विचारपुस करीत असताना पोलीसांना त्याचे बोलण्यामध्ये एकवाक्यता दिसुन आली नाही. त्यामुळे पोलीसांचा संशय वाढल्याने सखोल तपास व विचारपुस केली असता दिनांक 23 नोव्हेंबर  रोजी संध्याकाळी 5:30 वाजता दरम्यान वडील व मुलांमध्ये शाब्दीक वाद झाल्याने त्या वादाच्या रागातुन मुलगा तुषार याने वडील सुखदेव सोनुने यांना लोखंडी रॉडने ठार मारले असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. 

मृतकचा मुलगा तुषार सुखदेव सोनुने याचेविरुध्द अप क्र 1451/2019 कलम 302,201 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यास काल दिनांक 27 नोव्हेंबर  रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

वडिलांचा हत्त्यारा मुलगाच होता हे अगोदरच संशयात  झालं होते पण पोलिस यंत्रणेला त्याचे सबळ पुरावे मिळाल्याने एका नालायक मुला कडून चांगला बाप मारल्या गेला ही गोष्ट सामजिक मनावर वेदना देणारी ठरली आहे.