विदर्भस्तरीय एनसीसी कॅम्पमध्ये ज्युबिली हायस्कूलची मयुरी आलाम अव्वल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भस्तरीय एनसीसी कॅम्पमध्ये ज्युबिली हायस्कूलची मयुरी आलाम अव्वल

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर: 


महाराष्ट्र एनसीव्ही बटालियन नागपुर मार्फत सावनेर येथे आयोजित दहा दिवसीय एनसीसी कॅम्प मध्ये चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये 9 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी मयुरी अनिल आलाम तिने खोखो, परेड ड्रिल या खेळात प्रथम स्थान पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


सीएटीसी 621 या कॅम्पचे आयोजन 22 ते 31 ऑक्टोबर 2019 दरम्यान करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये विदर्भातील विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये परेड सांस्कृतिक कार्यक्रम खेळ बौद्धिक प्रथमोपचार, आपत्तीव्यवस्थापन, ट्राफिक कंट्रोल, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. 

यामध्ये चंद्रपूर शहरातील जुबिली हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणारी मयुरी अनिल आत्राम हिने खो खो या खेळात प्रथम स्थान तर परेड ड्रील मध्ये प्रथम सोबतच रायफल फायरिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. नागपूर ग्रुपचे विंग कमांडर एम. कलीम व कमांडिंग ऑफिसर कर्नल रवी खसनिज, सुभेदार मेजर, त्रीलोक सिंग यांनी मयुरीला मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून तिचा गौरव केला.

यावेळी ज्युबिली हायस्कूल चंद्रपूरच्या वतीने प्राचार्य रवींद्र काळबांडे, एनसीसी ऑफिसर मोरेश्वर बारसागडे व शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्गाने मयुरीचे अभिनंदन केले आहे.