रोजंदारी कामगारांच्या अनेक समस्यांच्या निराकरणा करीता स्वराज्य बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने शुक्रवारला तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनाचे करन्यात आले आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर प्रतिनिधी ( जावेद पठाण )-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे कामगांराना व त्यांच्या कुटुंबाना बहुविध योजनांचा लाभ देण्यात येते. मात्र शासण प्रशासणाच्या उदासीनतेमुळे कामगांराची नोंदणी व लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत.
नोंदणीकृत कामगार व इमारत कामगारांच्या विविध एकविस समस्यांना घेऊन एक दिवसीय आंदोलनाचे आयोजन केले आहे. या धरणे आंदोलनाचे मार्गदर्शन स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष धनराज गेडाम ,राज्य कोषाध्यक्ष शारदा गेडाम , राज्यकार्यालयीन सचिव नरेश पिल्लेवान उपस्थीत राहनार आहे . धरणे आंदोलनाचे नेतृत्व राज्यसचिव देवचंद टेंभूरकर , प्रंशांत घुग्घुसकर , गुरूदास सोनटक्के , राकेश लांजेवार , सुरज पाल , गजानन शेडामे , रविंद्र गोंगले , बंडू सोनवाने , श्याम नंदागवळी, तुळशिदास बन्सोड , अलिम शेख करणार आहेत .
कामगारांच्या न्याय हक्का करीता आयोजीत धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर दुपारी 12.०० वाजता सुरू होईल. या धरणे आंदोलनाला तालुक्यातील बांधकाम कामगारांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन स्वराज्य बांधकाम कामगार संघटना चिमूर तालुका व चिमूर शहर कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे .