कारवाई ऐवजी शिक्षण विभागाचा चौकशीचा फार्स : शिवाजी शाळेचे आरटीई घोटाळा प्रकरण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कारवाई ऐवजी शिक्षण विभागाचा चौकशीचा फार्स : शिवाजी शाळेचे आरटीई घोटाळा प्रकरण

Share This
माझ्या मुलीची निवड  आरटीईमध्ये झाली असतांना माझ्यासारख्या मजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍याकडून गरीब कुटुंबाकडुन जवळपास ३००००/- शिक्षण शुल्क वसुलले पैसे देण्यास शाळेची मुख्याध्यापिका टाळाटाळ करीत असुन शाळेचा रेकार्ड पुरामुळे वाहुन गेल्याचे सांगत आहे - सुरेंद्र राम, नांदाफाटा  शिक्षणाधिकारी लोखंडेच्या निलंबनाची मागणी 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -नांदाफाटा प्रतिनिधी
 


कोरपणा तालुक्यातील नामांकित  शाळा म्हणून नांदाफाटा येथील  शिवाजी इंग्लिश मिडीयम शाळेचे  नाव होते नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी या शाळेचा आरटीईचा लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशान्वये कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आंनद धुर्वे व त्रिस्तरीय समितीने चारदा चौकशी करुन चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कारवाईकरिता पाठविला.सदर अहवालात आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त असतानाही या विद्यार्थ्यांकडून सतत सात वर्ष लाखो रुपये शाळेने वसुल केल्याचे नमुद असुन अनेक पालकांच्या बनावट व  बोगस स्वाक्षऱ्यांचे प्रमाणपत्र शिवाजी इंग्लिश मिडियम शाळेद्वारे शिक्षण विभागास पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे शिवाजी शाळेने सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क ७ दिवसाचे आत विद्यार्थ्यांना परत करावे असे आदेशित केले असतांनाही वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही शाळा अनेक विद्यार्थ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे गटशिक्षण अधिकारी आनंद धुर्वे यांनी सदर शाळेची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करावी असा अहवाल पाठविला.

शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी कारवाई करण्याऐवजी चौकशी अहवाल दाबून ठेवला होता तक्रार करते अभय मुनोत यांनी अनेकदा शिक्षणाधिकारी लोखंडे यांची भेट घेऊन शाळेवर कारवाई करण्याबाबत निवेदनाद्वारे विनंती केली असता शिक्षणाधिकारी लोखंडे स्वतःची पाठ थोपटून घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात कमी बोगस शाळा आहेत तुम्ही पालघर जिल्हा बघा असे सांगत होते शिवाजी इंग्लिश मीडियम शाळेवर आपण का कारवाई करत नाही असा सवाल विचारला असता आम्हाला जिल्ह्यात २५०० शाळा चालवाव्या लागतात आम्ही शाळेवर आता कुठलीही कारवाई करू शकत नाही असे सांगुन कारवाई करण्याऐवजी तक्रार कर्त्यांशीच हुज्जत घालत होते तसे लेखी पत्र तक्रार करते अभय मुनोत यांनी शिक्षणाधिकारी लोखंडे यांना मागितले असता त्यांनी असमर्थता दर्शवली.माझी मुलगी ऋतुजा डाखरे हिचे शिक्षणशुल्काचे  जवळपास ६००००/- रुपये माझेकडुन वसुललेले माझी बनावट सही सुद्धा शाळेव्दारे केली माझ्या मुलीचा आरटीई अंतर्गत प्रवेश असल्याचे मला ७ वर्षानंतर अभय मुनोत मुळे माहित झाले मला शाळेने फक्त २००००/- रुपये परत केले माझ्या सारख्या अनेकांची फसवणुक शाळेनी केली आहे -विकास डाखरे, नांदा. शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी शाळेच्या शिक्षकांसोबत विदेशवारी करतो त्याची साधी चौकशी शिक्षणाधिकारी करित नाही लाखो रुपयांचा पगार घेणारे अधिकारी झोपेत असल्याने शाळेने सतत सात वर्षे विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले अनुसूचित जाती ,  जमाती व दुर्बल वंचित घटकातील प्रवेशित विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते पालकांच्या बोगस सह्या केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध होते RTE Act 2009 अन्वये कलम १२(३) नुसार शाळेची मान्यता रद्द करून फौजदारी गुन्हा नोंदवण्याऐवजी ४ वेळा चौकशी होऊनही परत चौकशीचा फार्स हा शाळेला वाचविण्यासाठी शिक्षणाधिकारी लोखंडे यांचा प्रयत्न असल्याचे मला वाटते न्याय मिळत नसल्याने लोखंडे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी कोरपना पंचायत समितीसमोर लवकरच उपोषणाला बसणार आहे. -अभय मुनोत, ग्रामपंचायत सदस्य नांदा.
          
                 
शिक्षणाधिकारी लोखंडे कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याने अखेर अभय मुनोत यांनी शिक्षणाधिकारी लोखंडे यांनाच जबाबदार पकडून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर  त्यांच्याकडे लोखंडे यांच्या निलंबनाची मागणी करत मुंडन व धरणे आंदोलनाचा इशारा दिला असे असतांनाही शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी थेट शाळेवर कारवाई करण्याऐवजी परत १५ महिन्यानंतर आरटीई घोटाळ्याची चौकशी त्रिस्तरीय समितीने करावी असा आदेश दिला असुन १४ नोहेंबरला चौकशी होणार आहेत सतत सात वर्षे पैसे वसुलणार्‍या व बनावट , बोगस सह्यांचे प्रमाणपत्र शिक्षण विभागास पाठविणार्‍या  शाळेला शिक्षण विभागाचे अधिकारीच वाचवण्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी लावला  असुन त्रिस्तरीय समितीच्या चौकशीत काय सिद्ध होते याकडे लक्ष लागले आहेत