नागरपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या : कारण गुलदस्त्यात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागरपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या : कारण गुलदस्त्यात

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -


सिंदेवाही नगर पंचायतीचे शिपई श्रीराम चंद्रुजी कंबलवार (वय 45 वर्षे )यांनी आपल्या राहत्या किरायाचे खोलीत गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सविस्तर वृत असे की, 8 महिन्यापूर्वी गडचांदूर नगरपरिषद येथून सिंदेवाही नगरपंचायत ला बदलून आलेला व शिपाई या पदावर कार्यरत असलेला श्रीराम चंद्रुजी कंबलवार हे कोरपना तालुक्यातील कळमना येथील रहिवासी असून त्याची पहिली पत्नी मरण पावल्यामुळे दुसरी पत्नी संगितासोबत गडचांदूर येथून सिंदेवाही येथे बदली झाल्याने नगरपंचायत कर्मचारी सुधाकर निकूरे यांचे घरी इंदिरा नगर, सिंदेवाही येथे सहकुटुंब किरायाने राहत होते.


दिवाळी सनानिमीत्त पत्नी संगीता ही आधीच कळमना येथे गावी गेली होती. मृतक हा सुद्धा 01 नोव्हेंबर  ला कळमना येथे घरी गेला व तिन दिवस मुक्काम करून कुटुंबासोबत राहून 5नोव्हेंबर  ला सायंकाळी सिंदेवाही येथे परत आले.  सायंकाळी घरमालकाकडे पुजा असल्याने तिकडेच जेवन करून आपल्या रुममध्ये झोपायला गेले. दिनांक 6नोव्हेंबर ला  सकाळी उशिरापर्यंत कामाला न गेल्याने झोपून असेल म्हणून घरमालकाने आवाज दिला असता, त्याचेकडून कांहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे सकाळी 8:30 वाजताचे दरम्यान खिडकीतून डोकावून पाहिले असता स्वयंपाक खोलीतील घराचे आड्याला दोराने गळफास घेऊन लटकलेल्या स्थितित आढळून आल्यामुळे मृतकाची पत्नी संगीता हिला भ्रमणध्वनी वरून कळविण्यात आले. 

तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन ला जाऊन माहिती दिल्यामुळे लगेचच पि. एस. आय. गोमिद पाटील व सहकारी कर्मचारी घटणास्थळी दाखल झाले. व प्रेत खाली उतरवून मृतदेहाचा  पंचनामा केला. आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले. सायंकाळी तेथील डॉक्टर कुलसंगे यांनी प्रेताचे शवविच्छेदन करून, मृतदेह नातेवाईकांचे स्वाधिन केले. 

मात्र आत्महत्येचे कारण अजून तरी उलगडले नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय श्रीकोंडावार करीत आहेत. मृतकाचे पश्च्यात म्हातारी आई, भाऊ व पत्नी असा परिवार असल्याचे कळते.