विक्री नव्हे, बँक लुटण्याची होती योजना : नोझल बंदूक प्रकरणाला वेगळे वळण : भाजपा हेवी-वेट कार्यकर्ता हितेश चव्हाण सहित साथीदार अटकेत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विक्री नव्हे, बँक लुटण्याची होती योजना : नोझल बंदूक प्रकरणाला वेगळे वळण : भाजपा हेवी-वेट कार्यकर्ता हितेश चव्हाण सहित साथीदार अटकेत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
राजुरा तालुक्यातील आसिफाबाद रोड वरील तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या देवाडा (सिद्धेश्वर) येथे काल दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी  दुपारी 4 वाजता च्या सुमारास गावातील नागरिकांनी बंदुकी सहित दोन इसमांना पकडल्याने परिसरात खडबड उडाली होती.त्यासंदर्भात सदर नोझल बंदूक विनापरवाना भाजपा कार्यकर्त्याने विक्रीस आणल्याची चर्चा परिसरात होती. परंतु या घटनेत अधिक पोलीस तपासाअंती नवीन तथ्य सामोरे आल्याची,  नाव न लिहिण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.


सविस्तर माहिती नुसार गडचांदूर येथील रहिवासी हितेश चव्हाण सकाळी 11वाजता बिना क्रमांकाची पांढरी ऍक्टिवा गाडी घेऊन पारधीगुडा(लक्कडकोट) येथे जाऊन मित्र बाळू देवगडे याला सोबत घेऊन देवाडा येथून काही किलोमीटर वर असलेल्या लक्कडकोट येथे जाऊन मद्यपान केले. त्या नंतर हितेश चव्हाण याने बाळू देवगडे याला बंदुकीचा धाक दाखवून  बँक लुटण्याची योजना सांगितली. यानंतर दोघेही लक्कडकोट येथून ऍक्टिवा गाडीने गडचांदूर येथे जाण्यास निघाले या दरम्यान सोंडो ते भुरकुंडा या दोन गावांच्या मधे असताना या दोघांत आपसी वादविवाद झाला त्यानंतर बाळूने  बंदूक घेऊन लगतच्या शेतात धावत जाऊन जवळच असलेल्या नाल्यात  बंदुकूच्या गोळ्या फेकल्या.दरम्यान बाळू शेतात धावत गेल्यावर त्याच्या शोधात पुन्हा पारधीगुडा (लक्कडकोट ) येथे येऊन पोहोचला.परंतु काही वेळ वाट बघितल्यावर सुद्धा बाळू पारधीगुडा येथे आला नाही बघून चव्हाण परत देवाडा (सिद्धेश्वर ) फाटा येथे येऊन थांबला  असता तिथे बाळू पायदळ चालत पोहोचताच  दोघात कडाक्याचे भांडण झाले. दोघेही मद्यपान करून असल्याने भांडण हमरी-तुमरी-हाणामारी  वर आले.

हितेश चव्हाण हा भाजपचा हेवी-वेट कार्यकर्ता म्हणून परिसरात फिरायचा त्यामुळे अनेक परिचितांनी त्याला ओळखले व चौकातील नागरिकांनी धाव घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला असता उलट या दोघांनीच बंदूक दाखवून नागरिकांना धमकविण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर नागरिकांनीच घेराव करून हितेश चव्हाण व बाळू देवगडे दोघांनाही पकडून ठेऊन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरून माहिती दिली असे प्रत्यदर्शी ने टीम खबरकट्टा ला माहिती दिली.  त्यानंतर राजुरा पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या चमूने ठिकाण गाठत तात्काळ अटक करून गुन्हा काल रात्री उशिरा राजुरा पोलीस ठाणे  नोंदविला व पुढील तपास सुरु आहे.