नाभिक समाजाच्या व्यवसायावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी : राजुरा सलून अससोसिएशन ची पानठेला व्यवसायिका विरोधात पोलिसात तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नाभिक समाजाच्या व्यवसायावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी : राजुरा सलून अससोसिएशन ची पानठेला व्यवसायिका विरोधात पोलिसात तक्रार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -



सोशल मीडिया वर सलून भाववाढीच्या संदर्भात टीकाटिप्पणी केल्याने नाभिक समाजाला बदनाम करण्याचा हा जाणूनबुजून प्रयत्न असल्याचे सलून अससोसिएशन राजुरा, धोपटाला, चुनाळा च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नेऊन ठेवला असून कारवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर माहिती नुसार शहरातील एका पानठेला व्यावसायिकाने नाभिक समाजाच्या वडिलोपार्जित व्यवसाय असलेल्या सलून दराबाबत आक्षेपार्ह टीकाटिपण्णी केल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सलून अससोसिएशन पदाधिकाऱ्यांनी केला आहे.अभद्र टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या पानठेला व्यावसायिकाने नाभिक समाजाच्या व्यवसायावर  टीकाटिप्पणी करताना अभद्र भाषेचा उल्लेख करत मनमानी भाववाढीचा निषेध करून दोन रुपयांच्या ब्लेड च्या वापरातून 40-50 रुपये दाढीचा दर आकारण्यात येत असल्याचे पोस्टमध्ये नमूद केले आहे.तसेच एकाच कैचीचा वापर करून त्यातून 70-80रुपये वसूल केले जात असल्याचे या निषेध पोस्ट मधे म्हटले आहे.ही दरवाढ म्हणजे ग्राहकांची लूट असून यांना धडा कोन शिकवणार असे ही आवाहन केले आहे.



या आक्षेपार्ह टीकाटिप्पणी मुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, भाव दरवाढीबद्दल एखाद्याला आक्षेप असल्यास त्याने ग्राहक मंचात तक्रार द्यावी, पण व्यवसायात अश्या टिप्पण्या खपवून घेणार नाही, असा इशारा सलून अससोसिएशन चे अध्यक्ष आकाश वाटेकर, उपाध्यक्ष शंकर नागवेली, दिवाकर वाटेकर, सचिव घनश्याम चौधरी यांनी पोलिसात तक्रार दाखल करून कारवाही ची मागणी केली आहे.