सिमेंट कंपन्यांच्या अवैध पार्किंग विरोधात मनसे आक्रमक ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिमेंट कंपन्यांच्या अवैध पार्किंग विरोधात मनसे आक्रमक !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

चंद्रपूर जिल्ह्यात कारखान्यांचा गड असलेल्या राजुरा, कोरपना तालुक्यातील राजुरा ते गडचांदूर मार्गावर दोन मुख्य सिमेंट निर्मिती उद्योग असून या उद्योगांमधुन जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.मात्र या उद्योगांतील जड वाहतुकीची वाहने मात्र राजुरा ते गडचांदूर रोडवर दुतर्फा उभी असतात.  
उपरवाही नजीक अंबुजा सिमेंट कंपनीने स्वतंत्र पार्किंगजागा उपलब्ध केली मात्र त्या ठिकाणी असलेल्या ढिसाळ नियोजन व वाहन चालकांच्या कामचलाऊ पणामुळे अनेक जड वाहने परिसरात दिवसरात्र उभी असतात.तसेच गडचांदूर येथे सुद्धा माणिकगड रोड ते मुख्य रोड परिसरात हीच स्थिती असते. 

यामुळे सामान्य नागरिकांना सदर ठिकाणून वाहतूक करताना भयंकर त्रास व प्रदूषणाला सामोरे जावे लागत असून रात्रीच्या वेळी अनेक अपघात येथे घडत आहेत. या संबधीची तक्रार वारंवार करूनही कंपनी प्रशासन मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

या ज्वलंत अडचणीवर आज दिनांक.16 नोव्हेंबर ला राजुरा विधानसभा मनसे तर्फे अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही, माणिकगड सिमेंट कंपनी गाडचांदूर समोरील अवैध जडवाहतुक व रोडवरील  अवैध पार्किंग विरोधात सुरज ठाकरे राजुरा विधानसभा मनसे , मनदिप रोडे शहर अध्यक्ष मनसे चंद्रपुर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

या मध्ये रोडवरती चालण्याऱ्या व  दुचाकी तसेच नागरिकांना आपला जिव धोक्यात टाकुन जावे लागते याकरिता मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत रोडवरील जड वाहने हटविण्यात आले. यात प्रामुख्याने  चड्ढा ट्रान्सपोर्ट, डी एन आर ट्रान्सपोर्ट पंकज &सचिन ट्रान्सपोर्ट व इतर ट्रान्सपोर्ट च्या गाड्या हटविण्यात आल्या.

या आंदोलनात  निखिल बजाइत , ईशान शेख, जगदिश , मिथुन महकुलकर, सुरेश कामळी, प्रशांत वानखेडे,अमोल तिवारी सहित अनेक नागरिक उपस्थित होते.