खोडदा नदीवरील बंधाऱ्यात आढळला परप्रांतीय युवकाचा मृतदेह : नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम गहाळ असल्याने घातपाताची शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खोडदा नदीवरील बंधाऱ्यात आढळला परप्रांतीय युवकाचा मृतदेह : नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम गहाळ असल्याने घातपाताची शक्यता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -
तालुक्यातील खोडदा नदीवरील बंधाऱ्यात बुडालेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी  एका इसमाचा मृतदेह आढळुन आला असून आत्महत्या की घातपात असा संशय परिसरात व्यक्त केली जात आहे. मृतदेहाची ओळख झाली असून तो मूळचा राजस्थानातील सुरेशकुमार आसुराम चौधरी (२२वर्ष) आहे.
      
मृतक मूळचा राजस्थानातील   नागोर जिल्ह्यातील  आहवेलिसीयार गावाचा असून तो  मागील चार महिन्यापासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा  गावात वास्तव्याने राहत होता.  दरम्यान तो खडसंगी येथे वास्तव्याने असलेल्या चुलत भावाकडे येणे - जाणे करीत असायचा. रविवारी सकाळी तो खडसंगी येथे आपल्या चुलत भावाकडे आला होता. पण सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने त्याच्या चुलत भावाने शोधाशोध केली असता त्याला खडसंगी-मुरपार मार्गावरील जंगलात असलेल्या खोडदा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याजवळ त्यांची चप्पल व इतर साहित्य आढळून आले होते. या प्रकारची माहिती त्यांनी चिमूर पोलिसांना कळवली होती.
     
सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळुन आला होता. दरम्यान  पोलिसांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढून पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलिसांची चमू करीत आहे.
    
मृतकाच्या नातेवाईकानीं चंदनखेडा येथून निघाताना चाळीस हजार रुपये असल्याची माहिती दिली.पण घटनास्थळी त्याचा मोबाइल,चप्पल, जाकेट, पाकीटात दोनशे रुपये आढळून आले. व्यवसायानिमित्ताने मूळ गाव सोडून या परिसरातील आलेल्या इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने व नातेवाईकानीं दिलेल्या माहितीनुसार त्याच्या जवळची आर्थिक रक्कम आढळली नसल्याने नागरिक आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त करीत आहेत.