गडचांदूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांचे असे असेल प्रभागनिहाय आरक्षण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांचे असे असेल प्रभागनिहाय आरक्षण

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर नगर परिषदेच्या २०२० मधे होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाली असुन आज मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळ्की ह्यांनी प्रभागनिहाय आरक्षण जाहिर केले आहे.


पाच वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या गडचांदूर शहरातील ही दुसरीच सार्वत्रिक निवडणुक असुन १७ वार्डांना ८ प्रभागामधे वर्गीकृत करून त्यानुसार जाहिर झालेले प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे.

‘अ’ गटातील आरक्षण – प्रभाग क्र. १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. २ अनुसुचित जाती (महिला), प्रभाग क्र. ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ४ अनुसुचित जाती (महिला), प्रभाग क्र. ५ अनुसुचित जमाती, प्रभाग क्र. ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ७ अनुसुचित जाती, प्रभाग क्र. ८ अनुसुचित जमाती (महिला)


‘ब’ गटातील आरक्षण – प्रभाग क्र. १ सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ६ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ७ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग

क’ गटात केवळ प्रभाग - क्र. ८ सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षित आहे.

तर नगराध्यक्ष पदाकरिता पूर्वीच अनुसूचित जमाती (महिला ) हेच आरक्षण जाहीर झाले आहे.