रेल्वे क्रॉसिंग जवळ आढळला तरुणाचा मृतदेह - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेल्वे क्रॉसिंग जवळ आढळला तरुणाचा मृतदेह

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
मारेगाव येथील योगेश रामभाऊ गहुकर (28) हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तासिका तत्वावर निदेशक म्हणून कार्यरत होता. शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर सकाळी 7 वाजत वाहन चालक परवाना काढण्याकरिता तो मारेगाव येथील घरातून वणी येथे जाण्यास निघाला. परंतु रात्री उशिरा पर्यत घरी न पोहोचल्याने व मोबाईल बंद असल्यामुळे त्याच्या घरच्यांच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
त्याच्या कुटुंबियांनी काही लोकांना सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली. मात्र दुपारी 4 वाजताच्या दरम्यान वणी शहराजवळील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ त्याचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी पाहणी करून सदर मृतदेह हा योगेशचा असल्याची खात्री केली.
वणी व मारेगावात चर्चेला उधाण :

योगेशचा मृत्यूचे कारण अध्यापही समजू शकले नाही. तरीदेखील परिसरात योगेशचा मृत्यू हा प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय माया चाटसे करीत आहे. वरील घटनेमुळे योगेशच्या कुटुंबियांच्या ,मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.