"प्रेम हे अयशस्वी होऊ शकतं,परंतू वाईट नाही!"-आदित्य आवारी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"प्रेम हे अयशस्वी होऊ शकतं,परंतू वाईट नाही!"-आदित्य आवारी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


प्रेमाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले तर आकर्षण हा केंद्रबिंदू दिसुन येतो.याचा अर्थ असा नाही की सर्वच प्रेमाच्या नात्यात आकर्षणालाच महत्त्व असते,माझ्या मते तर ९०% जोडपी आकर्षणाला महत्त्व देतात व १०% जोडपी हे ते त्यांच्या नात्याला महत्त्व देत असतात.'दोन समविचारी मने एकत्रित आली की खरं प्रेम होतं' हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रेम करणे वाईट नाही परंतु अलीकडच्या काळात वारंवार घडत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या विळख्यात लोकांचा प्रेमवीरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे,हे ही कोणी अमान्य करू शकत नाही.


प्रेम ही भावना जर वाईट असती तर कोणत्याही कौटुंबिक नात्यात माया,आपुलकी आलीच नसती,मग आपण प्रेमाला वाईट का बरं म्हणावे? आमच्या साहित्यिकांच्या बाबतीत असं बोलं जातं की, एखाद्याच्या प्रेमात न पडल्याविणा कवी कविता लिहूच शकत नाही तर, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर असो वा निसर्गातील घटकांवर सुद्धा कवीचे प्रेम होऊ शकतेच ना? मग त्या कवीला समाज वाईट समजतो का?नाही ना? मग आपण प्रेम या भावनेला वाईट का बरं समजावे. 

प्रेम ही एक भावना आहे,मग ती भावना आकर्षणात घालवायची की नात्यात हे मात्र आपल्या हातात आहे. अनेक नाती प्रेमात अयशस्वी होताना दिसून येते.त्याला कारणही तेवढचं कठोर असते. आकर्षणाच्या प्रेम प्रकरणात.दोन समविचारी प्रेमवीरांची मात्र कोंडी होतांना दिसते हे कोणी अमान्य करू शकत नाही. कित्येक प्रेमवीर प्रेमात यशस्वी देखील झाले आहेत हेही आपल्या डोळ्यासमोर आहेत. 

मग प्रेमाला अन् अशा समविचारी मनांना वाईट म्हणवून घेण्यात का अर्थ आहे. याचाही आपण भविष्यात विचार करणे गरजेचे आहे,कारण येणारी पिढी ही प्रेमाच्याच सानिध्यातून जाणार आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे व प्रेम ही भावना आपुलकीची भावना आहे हे देखील आपल्या मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. जेणेकरुन येणारी पिढी "आदर्श प्रेम" ही भावना घेऊन पुढे येतील. 
म्हणून एकदा नक्की विचार करा.कारण,
"प्रेम हे अयशस्वी असू शकतं,परंतू वाईट नाही!"

धन्यवाद!

-आदित्य दिनकर आवारी 
  राजुरा,जि.चंद्रपूर-४४२९०५
  ९६०४०००९७६
  ईमेल-adityaawari47@gmail.com