अल्पवयिन मुलीवर बलात्कार करुन पाशवी अत्याचार करणार्या नराधमाला फाशिची शिक्षा द्या :- राजु झोडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पवयिन मुलीवर बलात्कार करुन पाशवी अत्याचार करणार्या नराधमाला फाशिची शिक्षा द्या :- राजु झोडे

Share This
-मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर च्या वतीने केली मागणी

खबरकट्टा / चंद्रपूर :

देशात अल्पवयीन मुलीवंर व महीलांवार होणार्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .चंद्रपूर जिल्ह्यातही या प्रकाराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन दिनांक 4 नोहेंबर 2019 रोजी गडचांदुर ता.कोरपना जि.चंद्रपूर एका अल्पवयीन  नराधमाने पहील्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन अत्याचार केला. अशा घटना घडु नये व यावर वचक राहावा करिता सदर नराधमास आजिवन कारवासाची शिक्षा देऊन फासावर चढवावे करिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

    
जर सदर नराधमास तात्काळ शिक्षा दिली नाही तर वंचित बहुजन आघाडी कडुन तिव्र आंदोलन करण्याच्या ईशारा राजु झोडे ,अझरुदिन मोहम्मद ,भूषण पेटकर,सचिन पावडे,अनिरुप पाटिल,पंचशिल तामगाडगे ,सुभाष उमरगुंन्डावार,आफ़ताब पठान, विशाल हस्ते,श् सिध्दांत ताकसाडे आदि कार्यकर्ता यांनी प्रशासनाला निवेदन दिला.