मुकुटबंन येथील सिमेंट कंपनी मुळे भोवताल चा परिसर व शेतकरी प्रदूषणाच्या विळख्यात :मंगेश पाचभाई यांची प्रदूषण प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुकुटबंन येथील सिमेंट कंपनी मुळे भोवताल चा परिसर व शेतकरी प्रदूषणाच्या विळख्यात :मंगेश पाचभाई यांची प्रदूषण प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

एम . पी. बिरला ग्रुप ही (R.C.C.P.L) सिमेंट कंपनी चे 
मागील दोन वर्षापासून  युध्द पातळीवर बांधकाम चालू आहे. या कंपणीमुळे आजूबाजूच्या परिसरात मौजा  मुकुटबन, खडकी, गणेशपूर या रस्त्यालगतच्या वाहतुकीमुळे शेतकऱ्याचे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे.

सिमेंट व इतर बांधकाम साहित्य वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या पिकावर धूळ जात असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होत आहे  तसेच परिसरात सुद्धा याच कंपनी मुडे प्रदूषण होत आहे. तसेच शेतकरी हे आधीच आसामानि सुलतानी संकटात सापडलेले आहे.हीच बाब लक्षात घेऊन युवा नेते मंगेश पाचभाई यांनी प्रादेशिक पर्यवरण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.