गुप्तधनाकरिता नरबळीचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेणे उघड : लहान मुलाची उपस्थिती व पोलीस पाटलांच्या कृत्या ने खळबळ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुप्तधनाकरिता नरबळीचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेणे उघड : लहान मुलाची उपस्थिती व पोलीस पाटलांच्या कृत्या ने खळबळ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
चंद्रपूर शहरालगत ताडोबा बफर झोन परिक्षेत्रात येणाऱ्या जुनोना गावात काल रात्री गुप्तधनाकरिता लहान मुलाचा  नरबळी देण्याच्या प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या सर्व प्रकाराला संचालित करताना आढळल्याने  या घटनेने रात्रभर गावात खळबळ माजली.  तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत  परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून अधिक तपास सुरु आहे.

प्रत्यदर्शीने टीम खबरकट्टा ला दिलेल्या थोडक्यात माहिती नुसार काल दिनांक  30 नोव्हेंबर  2019 रात्री जुनोना गावातील हिवरे यांच्या शेतातील घरी रात्री 9:30 ते 10 वाजता च्या दरम्यान  लगबग आढळून आल्याने गावातील काही नागरिकांना गडबड असल्याची शंका आली. 



त्यानंतर काही सतर्क नागरिकांनी घराच्या आडोश्याला राहून नेमका काय प्रकार आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अचानक त्यांना विविध तंत्र मंत्रवत आवाज येऊ लागले, व लहान मुलाचा रडण्याचा आवाज सतत येत होता. त्यानंतर नारळे फोडण्यात आली व बळी देण्याचे शब्द कानावर येताच या मंडळींनी लगेच रूम चे दार उघडून आत शिरल्यावर आतील चित्र बघून हा गुप्तधनाकरिता नरबळीचा प्रयत्न असल्याचे उघड झाले. 
गावकऱ्यांच्या माहिती नुसार घटनास्थळी 3 इसम व एक महिला सोबत एक लहान मूल होते. गावकऱ्यांनी धाबा दणानताच सोबत असलेल्या महिलेने  गावकऱ्यांवर स्त्रीत्वाचा फायदा घेत  आरडाओरडा सुरु केला या गडबडीत   दोन पुरुष लहान मुलाला घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले व धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकारात गावातील पोलीस पाटील जयपाल औरसे यांचे  वडील नत्थू औरसे सामील असून ते गावकऱ्यांना वारंवार विघ्न  न आणण्यासाठी विनवणी करीत होते.

घटनास्थळी आढळलेल्या साहित्य व लहान मुलाची उपस्थिती व घटना उघडकीस आल्यानंतर  त्या मुलाला  पळवून नेने हा संपूर्ण घटनाक्रम लक्ष्यात घेता, हा नरबळी देण्याचा असू शकतो याची सखोल चौकशी करून आरोपीना अटक करण्याची मागणी जुनोना गावकऱ्यांनी केली आहे.