औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटदार व्हि.के.इन्टप्राईजेस कंपनीतील कामगारांचे थकीत दिवाळी बोनस देण्यात यावे :- राजु झोडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटदार व्हि.के.इन्टप्राईजेस कंपनीतील कामगारांचे थकीत दिवाळी बोनस देण्यात यावे :- राजु झोडे

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात कार्यरत,  दुर्गापुर येथिल कंत्राटी व्हि.के.ईन्टरप्रायझेस  कंपनी मधिल काम करणार्या युनिट-8 व युनिट-9  कामगारांना त्यांचे दिवाळी बोनस दिले नाही.सदर कंपनीचे काम 2018 पासुन ते फेब्रुवारी 2019 पर्यंत चालु होते.परंतु कंपनीचे काम फेब्रुवारी 2019 ला समाप्त झाले. यादरम्यानचा काळातला कंत्राटी कामगारांना कंपनीने दिवाळी बोनस दिला नाही त्यामुळे त्या कंपनीतील कामगारांची दिवाळी अंधारात गेली.

तसेच सदर कंपनीने त्यांच्या हक्काचे बोनस न दिल्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी मा.मुख्य अभियंता सि.टी.पी.एस.यांना उलगुलान विद्युत कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन कामगारांना न्याय मिळवुन त्यांना बोनस मिळवुन द्यावा अशी  मागणी केली.
 
निवेदन देतांना राजु झोडे ,रवि पवार गुरु भगत भुषण पेटकर गुरु कामटे आकाश उघड़े राजु मशारकर अशविन खोब्रागडे आदि कामगार उपस्थित होते.