राजुरा शहरातील ऑटो चालकांच्या व वाहुतुकीच्या समस्येचा ठाणेदारांनी घेतला आढावा : लवकर ऑटो स्टॅन्ड साठी जागा उपलब्ध करून देणार-अरुण धोटे, नगराध्यक्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहरातील ऑटो चालकांच्या व वाहुतुकीच्या समस्येचा ठाणेदारांनी घेतला आढावा : लवकर ऑटो स्टॅन्ड साठी जागा उपलब्ध करून देणार-अरुण धोटे, नगराध्यक्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


दि.२४/११/२०१९ ला राजुरा पोलीस ठाण्यात नगराध्यक्ष अरुण भाऊ. धोटे आणि पोलीस निरीक्षक एम.एम.कासार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो चालक- मालक यांची बैठक पार पडली यात ऑटो चालकांच्या विविध प्रकारची समस्या जाणून तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि ट्राफिक समस्या, आणि दुसरी अडचण  ऑटो स्टॅन्ड साठी जागा उपलब्ध करुन जनतेला होणाऱ्या त्रास कमी करण्यासाठी उचित पाऊल उचलू असे आश्वस्त या वेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. 


सोबतच पोलीस विभाग सुद्धा जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहील आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर उचित कारवाई करण्यात येईल व शहरातील वाहतूक समस्येचा ताळमेळ लवकरात लवकर बसविण्यात येईल असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक एम एम कासार यांनी केले आहे.

या वेळी उपस्थित विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाजअहमद, साईनाथ बतकमवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक राव सहित  शहरातील सर्व ऑटो चालक-मालक व वाहतूक पोलीस कर्मचारी  उपस्थित होते.