शेतात मशागतीचे काम करताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतात मशागतीचे काम करताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

अवकाळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिकांवर झळ पसरल्याने अनेक शेतकरी पिकांवर ट्रॅक्टर फिरवून रबी हंगामाची तयारी करीत आहेत. अश्याच प्रकारे शेतात ट्रॅक्टर फिरवत असताना ट्रॅक्टर उलटून चालक-मालक शेतकऱ्याचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी चंद्रपूर तालुक्यातील भटाळी वेकोलि खाणीला लागून असलेल्या तिरवंजा शेतशेतीशिवारात घडली.


या अपघातात श्री गुरुदेव सेवा मंडळ शेणगाव चे प्रचार प्रमुख श्री चंद्रकांत धांडे (वय -35) दुखद निधन झालेतिरवंजा येथून जवळच शेतात ट्रॅक्टरने शेती मशागतीचे काम करीत असताना ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबल्याचे गावकऱ्यांना लक्षात येताच तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले परंतु पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय सदस्य असलेल्या धांडे यांच्या अचानक झालेल्या मत्यु ने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.