ब्रेकिंग न्यूज : पट्टेदार वाघ अडकलाय नदीपात्रातील खडकात. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : पट्टेदार वाघ अडकलाय नदीपात्रातील खडकात.

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

भद्रावती तालुक्यातील माजरी येथून 4 किमी अंतरावर असलेल्या शिवना नदीच्या पात्रातील दगडांमध्ये पट्टेदार वाघ फसलेल्या अवस्थेत आज नागरिकांना दिसला, वाघ नदी पत्रात बेशुद्ध जखमी अवस्थेत असल्याचे पुलावरून दिसत असले तरीही हालचाल होत नसल्यामुळे मृत की जिवंत याबाबत शंका आहे.वनविभागाची टीम शिवना नदीपात्राकडे निघाली असून लवकरच त्याबाबत पुष्टी होईल. 


वाघाला बघण्यासाठी परीसरातील नागरिकांनी शिवना नदीच्या पुलावर गर्दी केली आहे, शेत शिवारात भ्रमण करतेवेळी हा वाघ पडून नदीपात्रात पडला असावा.