शक्ती नगर प्रवेशद्वारावर रात्री दुदैवी अपघात : नुकतीच बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढविलेला युवक जागीच ठार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शक्ती नगर प्रवेशद्वारावर रात्री दुदैवी अपघात : नुकतीच बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढविलेला युवक जागीच ठार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरालगत असलेल्या शक्ती नगर वेकोलि वसाहतिच्या प्रवेश द्वाराजवळ काल दिनांक 5नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 10:45 वाजता दुचाकींचा दुर्दैवी अपघात होऊन युवकाचा  घटनास्थळीच मृत्यू झाला.





या अपघातात बल्लारपूर येथील रहिवासी सचिन टेम्भूर्णे (26)याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून. आताच आटोपल्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकराईट पार्टीचा उमेदवार म्हणून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविली होती.बल्लारपूर शहरातील काही भागात युवानेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या युवकाचा असा अनपेक्षित अंत अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.