राज्यातील सत्ता नाट्ट्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांची तीक्ष्ण प्रतिक्रिया - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यातील सत्ता नाट्ट्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांची तीक्ष्ण प्रतिक्रिया

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
भाजपा,कांग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी च्या नेत्यानी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला काळिमा फासला असून राजकीय सत्तेच्या खुर्चिसाठी महाराष्ट्रातील जनतेचे हाल करणार्या भाजपाला जनता माफ करणार नाही -राजु  झोडे,बहुजन वंचित आघाडी, चंद्रपूर. 

राजकीय नाट्यानंतर शेवटी देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पदाचा व अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. महाराष्ट्रातील इतिहासात आजपर्यंत एवढे गलिच्छ राजकारण जनतेनी उघड्या डोळ्यांनी बघितले नाही ते आज महाराष्ट्रातील जनता बघत आहे.

मागिल कित्येक महिण्यापासुन महाराष्ट्रातील शेतकरी,बेरोजगार,कामगार,सर्वसामान्य नागरिक समस्येने होरपळत असतांना सत्तेच्या खुर्चिसाठी हपापलेल्या राजकारण्यांना याची जराही जाणिव नसल्याने महाराष्ट्रातील जनतेचे मोठे हाल होतांना दिसत आहे. अशी प्रतिकीया टीम खबरकट्टा बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी दिली.