तोहोगाव आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना अनोळखी इसमांची शाळेच्या आवारात घुसून धक्काबुक्की : कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : विद्यार्थिनी गायब प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तोहोगाव आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना अनोळखी इसमांची शाळेच्या आवारात घुसून धक्काबुक्की : कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : विद्यार्थिनी गायब प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोठारी -आदिवासी विभागात एकात्मिक विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत अनुदानित आश्रम शाळा तोहोगाव येथील शाळेवर अनोळखी व्यक्तींनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे  परंतु  काही अनुचित प्रकार या शाळेत सातत्याने घडत असल्याने सर्वांचे लक्ष शिक्षण सोडून इतर बाबींवर वेधले आहे.

काही दिवसा अगोदर शाळेतून मुलगी गेल्याचं प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा तपासणी व व्यवस्था करण्यात आली होती यासंदर्भात संस्थापक राजेश मून यांची महत्वपूर्ण बैठक आश्रम शाळा तोहगाव येथे आज दिनांक 18 नवंबर 2019 ला त्यांच्या दरम्यान सुरूच असताना, बाहेरील तीन व्यक्ती शाळेतील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत बाहेर काढण्याचा प्रकार समोर आला आहे व शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षापासून वादग्रस्त असलेल्या प्रकरणामुळे वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

सदर अनोळखी तीन इसमावर कोठारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्रम शाळा तोहोगावचे मुख्याध्यापक विलास कोसरे यांच्याद्वारे तक्रार सादर केली होती. मात्र संस्थापक राजेश मून यांच्या सांगण्यावरून ते तीन अनोळखी व्यक्ती असल्याचे बोलले जात असून त्यांचे नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला असल्याने गुन्हा दाखल करण्याचे कारवाई पोलीस स्टेशन कोठारी येथे ते झाली आहे पुढील तपास हेडकॉन्स्टेबल यादव , बीट जमादार रागीट यांच्याकडे देण्यात आल्या आहे तरीही अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.