निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्याची आशिष ताजने यांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्याची आशिष ताजने यांची मागणी

Share This
-भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची नायब तहसिलदार यांच्याकडे तालुक्यातील 300पेक्षा अधिक प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्याची   मागणी.

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


           
कोरपना तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे असून ते तात्काळ मंजूर करण्यात यावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी श्री.विनय कौलवकर  नायब तहसिलदार यांना केली आहे.
            
कोरपना तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, ९ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटची संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पाडली,परंतु त्यांनतर २  महिने २१  दिवसानंतर एकही बैठक झालेली नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीकरिता प्रलंबित आहे,सध्या स्थितीला जवळपास ३०० च्या वरती प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना सदर बाबीचा फटका बसत आहे,त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.



मधल्या काळात निवडणूकीमुळे आचार संहिता व त्यानंतर राष्ट्रपती राजवटीमुळे सदर प्रकरणे मंजूर होऊ शकली नाही नाहीत,परंतु आता नवीन शासन राज्यात स्थापन झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेण्यात येऊ शकते त्यामुळे सदर योजनेची बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी नायब तहसिलदार श्री. विनय कौलवकर यांना केली आहे.

          
तसेच आपण येत्या एका आठवड्यात  सदर बैठकीचे आयोजन करून सदर प्रकरणे निकाली काढू असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी यावेळी आशिष ताजने यांना दिले आहे.