कोब्रादंशाने सर्पमित्राचा मृत्यू : सर्पमित्राला दशांची आठवड्यातील दुसरी घटना : वनविभागाकडे सर्पमित्रांची नोंद नाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोब्रादंशाने सर्पमित्राचा मृत्यू : सर्पमित्राला दशांची आठवड्यातील दुसरी घटना : वनविभागाकडे सर्पमित्रांची नोंद नाही

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -

वरोरा शहरातील टिळक वार्ड येथे राहत असलेले सोनू रेड्डी(  वय २३ ) या सर्पमीत्राचा कोब्रा साप चावल्याने दूर्देवी मृत्यू झाला.

मागील  तीन-चार वर्षांपासून सर्पमित्र म्हणून सामाजिक सेवा अपास एनजीओ मार्फत करत होता.टिळक वार्ड येथे साप निघाल्याची घटना कळताच, तो पकडण्यासाठी सर्पमित्र सोनू रेड्डी हे गेले होते. या कोब्रा जातीच्या सापाला पकडल्यानंतर सोडण्यासाठी जंगलात घेऊन गेले यादरम्यान साप सोडत असताना गवळ्या नाग -कोब्रा सापाने सर्पमित्राच्या हाताला दंश केला.त्यामुळे लगेच सर्पमित्र सोनू रेड्डी यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी धाव घेतली.  उपचारादरम्यान डॉक्टर गेडाम यांनी ऑंटी वेनम देऊन प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळेच प्रयत्न असफल ठरले त्यामुळे लगेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आणि सर्पमित्र सोनू यांचा दुर्दैवी मृत्यू उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे झाला.
या घटनेची वनविभागातर्फे अजूनपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नसून वरोरा शहरात किती सर्पमित्र कार्यरत आहे याची सुद्धा नोंद वनविभागाकडे नाही.आठवड्याभरापूर्वीच असाच एक सर्पमित्र धीरज घुमे याला साप सोडायला गेल्यावर मण्यार जातीच्या सापाने दंश केला असता त्यालाही जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते सुदैवाने तात्काळ त्याचे प्राण वाचले असले तरीही आज शहरात घडलेल्या या दुसऱ्या घटनेने साप जंगलात सोडायला जाने हे वन विभागाचे काम असून हे अनधिकृत सायंघोषीत सर्पमित्र साप पकडून स्वतःच सोडायला जातात कसे, प्रश्नचिह्न आहे.

यावेळी सर्पमित्र म्हणून त्यांचे सहकारी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. वरोरा शहरातील प्रतिष्ठित अजूभाऊ रेड्डी यांचे मोठे चिरंजीव होते. गेल्या दोन-तीन वर्षापासून सर्पमित्र म्हणून सोनू ख्यातीप्राप्त होता. शहरात कुठेही साप निघाला असता सर्पमित्र सोनूला फोन करून लगेच बोलून घ्यायचे व सापाला पकडून वनविभागात नोंद करून, त्याला जंगलात सोडून देण्याचे सामाजिक काम तो करत होता. त्यामुळे सर्पमित्र व आप्त परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मण्यार जातीच्या सापा सोबत खेळणे सर्पमित्राला पडले महागात : सापाने घेतला चावा - सर्पमित्र गंभीर  https://www.khabarkatta.com/2019/10/blog-post_33