मनसेसैनिक सुरज ठाकरे यांनी सामाजिक जाणिवेतून साजरी केली दिवाळी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनसेसैनिक सुरज ठाकरे यांनी सामाजिक जाणिवेतून साजरी केली दिवाळी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी -
दिवाळसन फक्त आपल्या परिवारातील सदस्यांपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक जाणीव जोपासत अनाथ -परिवार मुलांसोबत साजरा करून मनसेचे सुरज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या उदार व्यक्तिमत्वाचा परिचय दिला.काल दिनांक 3/11/2019 ला राजुरा तालुक्यातील मौजा  चुनाळा इथिल अनाथ आश्रमातील तीस मुलांना दिवाळी निमित्य मनसेचे सुरज ठाकरे यांच्या कडून मिठाई व जेवणाची मेजवानी दिली.एरव्ही या आश्रमात जाऊन आपला वाढदिवस  साजरा करण्याचा ट्रेंड सध्या राजुरा व लगतच्या परिसरात आहे परंतु दिवाळसण निमित्य आश्रमातील मुलांना हॉटेलिंग चा अनुभव देऊन  आनंद पसरविण्याचा हा पहिलाच उपक्रम यांनी केला. 


हॉटेलिंग हे एरव्हीच्या लहानग्या मुलांना प्रचंड  आवडणारी, त्यांच्यासाठी सुखदायी गंम्मत असते  असे एक पालक म्हणून मी अनेकदा अनुभवले. अश्यातच  असंख्य मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती, ताकत, ईश्वर मला देवो हीच त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना- सुरज ठाकरे, मनसे, चंद्रपूर. 

सदरच्या उपक्रमाला आश्रमातील सहकारी आणि सोबतस सुरज ठाकरे व परिवार यांचे सहकारी निखिल बाजाईत,जगदीप साठोने,शुभम सोयाम,अभिजित बोरकुठे,रंजीत उगे,भुपेश साठोने, आकाश वाटेकर,अनिल वर्मा,प्रशांत वाटेकर,विनोद बानकर,उपस्थित होते.