सिरसपुर नदी पात्रात चालतो रात्रीस रेती चोरीचा खेळ ! मंडळ अधिकारी व तलाठी नजरेसमोरून वाहतूक होत असतानाही आंधळे ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिरसपुर नदी पात्रात चालतो रात्रीस रेती चोरीचा खेळ ! मंडळ अधिकारी व तलाठी नजरेसमोरून वाहतूक होत असतानाही आंधळे ?

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :चिमूर प्रतिनिधी-जावेद पठाण- 


चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र रेती उत्खननावर उच्च न्यायालय नागपूर यांच्या आदेशान्वे जिल्हाधिकारी यांनी लिलावातील सर्व रेती घाटांवरील उत्खनन व वाहतुकीस स्थागिती दिली असून त्याउपर जिल्ह्यात कोणत्याही नदी-नाले घाटावरील रेती उत्खनन सध्यातरी अवैध असूनही चिमुर तालूक्यातील सिरसपुर नदी पात्रा मधून रात्रीला मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे.  येथून रेतीची तस्करी रात्रोच्या वेळेस ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने लाखो रुपयांच्या महसुलास चुना बसत असून हे सर्व ट्रॅक्टर भिसी येथील असल्याची चर्चा आहे.हि संपूर्ण ट्रॅक्टर भिसी मार्गे येत असून व त्याच मार्गाने वापस जात असल्याचे सकाळी या नदीपात्रात वाहतूक संकेत मिळतात.

तरी सुद्धा सदर विभायीय मंडळ अधिकारी  व तलाठी  यांच्या संगम मताने सुरू नाही ना?  प्रश्नचिह्न आहे कारण नदी पात्रात रेती उत्खनन व वाहतुकीचे स्पष्ट चित्र दिसून सुद्धा विरोधात कोणती ही कारवाई तहसिलदार व उप विभागीय अधिकारी करताना दिसत नाही.यात अधिकाऱ्यांचीच मिली-भगत असल्याचे सिरसपुर गावामध्ये सध्या चर्चा रंगली आहे. या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे  मुळे गावातील  कच्च्या रस्त्यांचे सुद्धा फार मोठी नुसकान होत असून लवकरात लवकर ही वाहतूक थांबवावी व या रेती तस्करावर कारवाई करण्यात यावी,अशी गावकऱ्यांतर्फे मागणी टीम खबरकट्टा सोबत बोलताना गावकऱ्यांनी केली आहे.