अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने "धरती आबा-क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा" जंयती साजरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने "धरती आबा-क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा" जंयती साजरी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने काल  दिनांक 15/11/2019 रोजी धरती आबा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा जंयती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी राजुरा शहरात प्रथमच रेला ग्रुप डान्स, आदिवासी पारंपारिक नृत्य, घुसाडि, ढोल, यांच्या गजरात, राजुरा शहराचे लक्ष आदिवासी समाजाने वेचून घेतले, असा भव्य दिव्य कार्यक्रम राजुरात पहिल्यांदा घेण्यात आला, एकप्रकारे समाजाचे शक्ति प्रदर्शन दिसले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा तालुका कमेटितिल सर्व पदाधिकारी, विशेष 1)विनोदजि गेडाम तालुका अध्यक्ष 2)अकुंशजि कुडमेथे, कार्याध्यक्ष, 3) अमृत आत्राम ता,उपाद्यक्ष 4)दिपक मडावी, तालुका सचिव, 5)मा.मारोती कोरवते सर ता,कोषाध्यक्ष ,6) मा.वाघोजी गेडाम ,ता ,संघटक 7),मा.विश्वेश्वर मडावा,ता सल्लागार 8)महिपाल मडावी जिल्हा महासचिव 9)नितीन सीडाम, उपाध्यक्ष, तसेच हिरा ज्योती मंडळ, रंजना ताई कोडापे, संतोष मडावी, बंडू मेश्राम,  मंगेश मडावी ,भोला ऊईके,पिंटु मडावी यांचे प्रामुख्याने सहकार्य लाभले.


तसेच राजुरा शहरातील  व्यापारीबंधू व   काही ईतरहि लोकांनि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, दान स्वरूपी मदत केली, ज्यांचे  या कार्यक्रमासाठी योगदान लाभले त्या सर्वांचे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेणे आभार मानले आहे.