ब्रेकिंग न्यूज :राज्यपालांकडून सत्ता स्थापने करिता चाचपणी : भाजपाला सत्ता स्थापनेची विचारणा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :राज्यपालांकडून सत्ता स्थापने करिता चाचपणी : भाजपाला सत्ता स्थापनेची विचारणा

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

राज्यात शिवसेना-भाजपा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून  स्वपुढाकाराने सत्तास्थापनेची  वेळ 8 नोव्हेंबर 2019 च्या रात्री संपल्यानंतर आज दिनांक 9 नोव्हेंबर ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली आहे.


यापूर्वी काल 8 नोव्हेंबर ला देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेला उशीर होत असल्याने राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला होता.


या संबंधात माध्यमांना माहिती देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांना होकार कळवायचा की नाही याबाबत उद्या कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली असून शिवसेनेसोबत बहुमत सिद्ध करण्याची प्राथमिकता आहे व तसें न झाल्यास   विधानसभा निवडणुकीत पक्षाचे 105 आमदार निवडून आल्यानंतर, 13 अपक्षांचा पाठिंबा घेता ही संख्या इतकी 118 झाली असून आता 145च्या बहुमताकरिता 22आमदारांची गरज असल्याचे सांगितले.

भाजपाने सत्तास्थापनेस होकार दिल्यास राज्यपाल रीतसर निमंत्रण देऊन,  शपथविधी घेऊन बहुमत सिद्ध करण्यास वेळ देऊ शकतात. भाजपाने नकार कळविल्यास किंवा निमंत्रण स्वीकारून बहुमत सिद्ध न केल्यास घटनात्मक तरतुदी नुसार पुढच्या पक्षाला बोलविण्यात येईल.