हे असतील शिवसेनेचे मुख्यमंत्री : ठाण्यात झडकले पोस्टर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हे असतील शिवसेनेचे मुख्यमंत्री : ठाण्यात झडकले पोस्टर

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादामुळे राज्यात सत्ता स्थापनेला वेळ लागत आहे. त्यातच शिवसेनेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे ठणकावून सांगत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर होणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईमध्ये सेनेकडून आदित्य ठाकरे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टबाजी केली जात आहे. असे असतानाच ठाण्यात देखील शिवसेनेकडून पोस्टबाजी सुरु केली आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये वाद सुरु आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर आडून बसले आहेत. या सर्व घडामोडींवर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेने संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ठाण्यातील कोलबाड परिसरात एकनाथ शिंदे यांचे फलक लागले आहेत.

आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना, असे भले मोठे पोस्टर ठाण्यात ठिकठिकाणी झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे.