धावत्या बसमधून हात बाहेर काढणे पडले महागात : गंभीर दुखापत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धावत्या बसमधून हात बाहेर काढणे पडले महागात : गंभीर दुखापत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

कोणत्याही वाहनातून प्रवास करताना हाथ, डोके बाहेर काढू नये अश्या सूचना अनेक प्रवाशी बसेस मधे लिहिल्या असतात, मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करून भरधाव बसमध्ये खिडकीजवळ बसून असताना हात बाहेर काढल्याने एका महिलेचा हात मोडल्याची घटना काल दिनांक 4नोव्हेंबर ला चंद्रपूर जिल्ह्यात घडली.


सर्विस्तर वृत्तानुसार जिल्ह्यातील राजुरा आगारा अंतर्गत गोविंदपूर-चंद्रपूर  एमएच 34/8978 ही बस गोंडपिपरी वरून चंद्रपूर येथे जात असताना अहेरी-नागपूर ही बस नागपूर हुन अहेरीकडे जात होती. याच अहेरी नागपूर बसमधील महिला प्रवाशी ज्योती दिलीप शोबळे (41) हिने खिडकीतून बसच्या बाहेर हात काढला होता.मात्र गोविंदपूर-चंद्रपूर बसच्या चालकाने गोंडपिपरी नजीकच्या गणपुर गावालगत अहेरी बसला भिडून घासत नेल्याने, महिला प्रवाश्याच्या हाताला कोपराजवळ गंभीर दुखापत झाली. 

त्यानंतर अहेरी बस चालकाने सरळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी गाठल्यावर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला परंतु गंभीर स्थिती बघता पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. या सर्व घडामोडीत आपल्याच मन-मौजीत असलेल्या गोविंदपूर-चंद्रपूर बस चालकाने थांबा घेऊन साधी विचारपूसही करण्याचे औदार्य दाखविले नसल्याने प्रवाशी चांगलेच भडकले होते.