गोंडवाना विद्यापीठातील विदयार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्याची अभाविप चंद्रपूर ची मागणी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा द्यावा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडवाना विद्यापीठातील विदयार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्याची अभाविप चंद्रपूर ची मागणी : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा द्यावा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राज्यात मोठ्या प्रमाणात सर्वदूर पाऊस पडला त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सर्व शासकीय यंत्रणा पंचनामे करण्यात गुंतून आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण शेती पाण्यात बुडून गेली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. गोंडवाना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मुल शिक्षण घेतात.



            
परीक्षा शुल्क भरणे शक्य होत नाही आहे.त्यामुळे त्यांची परीक्षा शुल्क माफ करावे. मोफत बस पासेस उपलब्ध करून द्यावे. इतर कोणतेही महाविद्यालयीन आणि शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर तर्फे मा. जिल्हाधिकारी यांना अप्पर जिल्हाधिकारी तेजस्विनी पाटील यांच्या मार्फत देण्यात आले. 


               
निवेदन देतांना चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, नगर विस्तारक दामोदर द्विवेदी, नगर समिती उपाध्यक्ष ऋषिकेश बनकर, सदस्य यश बांगडे, शुभम निंबाळकर, रोहित खेडकर, श्रेयस श्रीगडीवार, अमोल मदने उपस्थित होते.